भडगाव: न्यू मिलन हॉटेलमध्ये गॅसच्या हंड्या काढून त्यांची अदलाबदल करीत असतांना स्फोट, 12 जण जखमी, भडगाव पोलिसात गुन्हा दाखल,
गॅसच्या हंड्या काढून त्यांची अदलाबदल करीत असतांना स्फोट झाल्याची खळबळ जनक घटना भडगाव शहरातील पारोळा चौफुली वरील न्यू मिलन चहा हॉटेल दुकानात घडली असून यात 12 जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली आहे, न्यू मिलन चहा हॉटेलचे मालक शेख रफीक शेख रज्जाक व त्यांचा मुलगा शेख सोहेल शेख रफिक यांनी मानवी जिवीत धोक्यात येईल अथवा कोणत्याही व्यक्तीला दुखापत होण्याचा संभव असेल ते या घटनेस कारणीभूत ठरले,