तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशनच्या पथकाने १३ जानेवारी रोजी रात्री ९ च्या दरम्यान डोंगरला बु. ते चांदमारा रोडवर गस्त घालत असताना अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई केली. डोंगरला बु. गावाकडून चांदमाराकडे जाणाऱ्या संशयास्पद टिप्परला (क्र. MH 40 CT 9564) पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता, त्यात विनापरवाना २ ब्रास रेती चोरटी वाहतूक करताना आढळली. या कारवाईत २० लाख रुपये किमतीचा टिप्पर आणि १२ हजार रुपयांची रेती, असा एकूण २० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.