दिग्रस: तालुक्यातील झिरपूरवाडी शेतशिवारात शेतमजुराची आत्महत्या; चार तासांच्या प्रयत्नांनंतर विहिरीतून मृतदेह काढले बाहेर
दिग्रस तालुक्यातील झिरपूरवाडी गावात शेतातील नापिकी व आर्थिक ताणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली. याबाबतची माहिती पोलीस पाटील वच्छला मिरासे यांनी दिग्रस पोलीस स्टेशनला दिली. पांडुरंग नथुजी बोडके (वय ४९) असे आत्महत्या केलेल्या शेतमजुराचे नाव आहे. त्यांनी झिरपूरवाडी शिवारात बटईवर शेती केली होती. याच शेतातील विहिरीत उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली. विहिरीत तब्बल ४० फुट पाणी असल्याने चार मोटारपंपांच्या सहाय्याने पाणी उपसा करण्यात आला.