पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक ३२ तास १५ मिनिटांनी संपन्न! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषद
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक ३२ तास १५ मिनिटांनी संपन्न झाली. विसर्जनानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन गणेशोत्सवातील सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती दिली.
आयुक्तांच्या माहितीनुसार, संध्याकाळी सव्वा सहा वाजता शेवटचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले.
गर्दी मोठी असतानाही ३३ रुग्णवाहिका मिरवणुकीच्या मार्गावरून मार्गस्थ झाल्या, अशी माहिती आयुक्तांनी दिली. तसेच गणेश मंडळांनी पोलिसांना चांगले सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले.
“मिरवणूक किती तास चालली यापेक्षा ती निर्विघ्नपणे कशी पार पडेल, याकडे माझं लक्ष होतं,” असे अमितेश कुमार यांनी सांगितले. पोलीस बंदोबस्ताबाबत पुणेकरांनी समाधान व्यक्त केल्याचेही त्यांनी नम�
Pune City, Pune | Sep 27, 2026