उपकेंद्र पांग्राबंदी येथे ‘स्वस्थ नारी सशक्त अभियान’ अंतर्गत आरोग्य शिबिर
1k views | Malegaon, Washim | Sep 24, 2025 वाशिम (दि.२४,सप्टेंबर): मालेगाव तालुक्यातील उपकेंद्र पांगराबंदी येथे आज ‘स्वस्थ नारी सशक्त अभियान’ अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ८७ स्त्रियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात २३ स्त्रियांची NCD अंतर्गत बीपी, आरबीएस, मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, १२ स्त्रियांची VIA तपासणी, १८ स्त्रियांची सिकल सेल तपासणी, तसेच ८७ स्त्रियांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. याशिवाय २ गरोदर मातांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली.शिबिरास सरपंच स्वतः, उपसरपंच यांच्या पत्नी उपस्थित होत्या.