चंद्रपूर शहरातील महाकाली परीसरात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीची वाढ होत आहे. परीसरात मादक पदार्थाची तस्करी होत आहे.याचा त्रास येथील सर्वसाधारण नागरीकांना होत आहे.येथील पोलीस चौकी चोवीस तास सुरु राहात नसल्याने या परीस्थितीवर आळा बसत नाही. त्यामुळे येथील पोलीस चौकी चोविस तास सुरु ठेऊन नागरीकांना न्याय द्यावा अशी मागणी भिम आर्मीतर्फे पोलीस अधिक्षक कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.