नागपूर शहर: दहेगाव-पिपळा मार्गावर कार व दुचाकीची अमोरासमोर धडक,एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत येणाऱ्या दहेगाव- पिपळा डाक बंगला परिसरात गजानन हॉलसमोर गुरुवारी रात्री ११:३० च्या सुमारास एक भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातात आशिष डोईफोडे याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही युवक एकाच दुचाकीवरून 'ट्रिपल सीट' प्रवास करत होते. त्याच वेळी एका कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला.