नागपूर शहर: नारा रिंग रोडवर ट्रक आणि टिप्परची भीषण धडक; कॅबिनमध्ये फसलेल्या चालकाला स्थानिकांनी जीवदान दिले!
नारा रिंग रोड परिसरात आज एका भरधाव ट्रक आणि टिप्परमध्ये अमोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर ट्रकच्या पुढच्या भागाचा (कॅबिनचा) अक्षरशः चक्काचूर झाला. या ढिगाऱ्यात ट्रकचा चालक गंभीर जखमी अवस्थेत अडकून पडला होता.अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ट्रकच्या केबिनचा भाग चेपला गेल्यामुळे चालक त्यात पूर्णपणे फसला होता आणि त्याला बाहेर पडणे अशक्य झाले होते.