पनवेल: लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा खून
Panvel, Raigad | Jun 10, 2026 लग्नासाठी सतत तगादा लावणाऱ्या प्रेयसीची लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निघृण हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळखही पटत नसताना तांत्रिक तपास आणि कौशल्यपूर्ण चौकशीच्या आधारे पोलिसांनी या खळबळजनक खुनाचा उलगडा केला.