ठाणे: रघुनाथ नगर येथील नवरात्र उत्सवामध्ये अभिनेते चंकी पांडे यांच्यासह भर पावसात तरुणाईने घेतला गरबा खेळण्याचा आनंद
Thane, Thane | Sep 28, 2025 रघुनाथ नगर येथे संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या पुढाकाराने नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या नवरात्र उत्सवांमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. तसेच नागरिक देखील या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. सायंकाळपासूनच शहरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र भर पावसात देखील रघुनाथ नगर येथील गरबा कार्यक्रमांमध्ये अभिनेते चंकी पांडे यांच्यासह तरुणाईने मोठ्या संख्येने हजेरी लावून गरबा खेळण्याचा आनंद घेतला.