नागपूर शहर: भवानीनगर येथे ६० वर्षीय वृद्ध कामगारावर सहकाऱ्याचा हल्ला: नंदा मनगटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी 30 जुलै ला सकाळी 10:30 ला दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या पारडी पोलीस ठाणे हद्दीतील भवानीनगरमधील एका टिंबर मार्केटमध्ये काम करणाऱ्या ६० वर्षीय नंदकिशोर हेडाऊ यांच्यावर त्यांच्याच सहकाऱ्याने डंड्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिली आहे.