तुमसर: डोंगरी बुजुर्ग येथे जुगार अड्ड्यावर गोबरवाही पोलिसांची धाड, २ लाख ८ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजुर्ग येथे दि. 18 सप्टेंबर रोज गुरुवारला सायं. 6 वाजता गोबरवाही पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड घालूनआरोपी विजय शहारे, नरेंद्र देशमुख, कैलास निर्मलकर, नितेश मुंगूसमारे, सोहन शेंडे, कमलेश बर्वे, राजकुमार साखरे, विरेन बर्वे यांना ताब्यात घेत आरोपीच्या ताब्यातून नगदी 8 हजार रुपये,4 मोटरसायकल व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण 2 लाख 8 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आठही आरोपीविरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.