नाशिक: अंबड भागातील शांतीनगर झोपडपट्टी येथे शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकाला पोलिसांनी केली अटल
Nashik, Nashik | Sep 14, 2025 अंबड भागातील शांतीनगर झोपडपट्टी येथे शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकाला पोलिसांनी 12 सप्टेंबर रोजी रात्री अटक करून 13 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 14 सप्टेंबर रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विठ्ठल अशोक जाधव राहणार शांतीनगर झोपडपट्टी, अंबड हा बेकायदेशीर रित्या धारदार लोखंडी कोयता बाळगून घराच्या परिसरात फिरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शस्त्र ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार साळवे पुढील तपास करीत आहे.