जालना: ऊसतोड कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल शेतकर्यांच्या बांधावर
Jalna, Jalna | Oct 1, 2026 ऊसतोड कामगारांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी अंबड महसूल उपविभागाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत ऊसतोड कामगार समस्या निराकरण व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शिबिराला भेट देऊन कामगार, विद्यार्थी व शेतकर्यांशी संवाद साधला. गुरुवार दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिबिराचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी केले. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचे व इतर प्रश्न समजून घेतले.