अलिबाग: जिल्ह्यात ३० जूनपर्यंत जलतरण तलाव बंद
Alibag, Raigad | Jun 23, 2026 जिल्ह्यातील उष्ण व दमट हवामान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध जलसाठ्यातील घट लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असलेले सर्व जलतरण तलाव (स्विमिंग पूल) २० जून ते ३० जून या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे अद्याप मान्सून जिल्ह्यात पूर्णपणे दाखल झालेला नसून उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवत आहे.