बसमत: वसमतच्या स्वानंद कॉलनी येथे दहा लाखाची जबर चोरी अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल
वसमतच्या स्वानंद कॉलनी येथे मारुती मल्लिकार्जुन स्वामी हे खाजगी संस्थेमध्ये लिपिक या पदावर असून ते व त्यांचा परिवार मुलींच्या अहिल्यानगरला एमबीबीएस ला नंबर लागल्याने गेले असता तीन नोव्हेंबर रोजी घराला कुलूप असल्याचा पाळत ठेवत चोरट्याने घरातील दरवाजाचे कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील दहा लाखापेक्षा अधिक सोने-चांदी पळवून सामान अस्ताव्यस्त केल्याचं निदर्शनास आल्याने शहर पोलिसात अज्ञात चोरटेविरुद्ध तीन नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करतात