नागपूर शहर: नागपूर बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर; ८९.०७% विद्यार्थी उत्तीर्ण, यंदाही मुलींनीच मारली बाजी!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय मंडळाने आज १० वीचा निकाल जाहीर केला. यंदा नागपूर बोर्डाचा एकूण निकाल ८९.०७% लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात काहीशी घट झाली असली तरी, यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यंदा परीक्षेला एकूण १,४७,७८३ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १,३१,६४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलींच्या निकालाची टक्केवारी ९३.३४% आहे.