नाशिक: शहरात गोदावरीचा पूर पाहण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांची गर्दी, दुतोंड्या मारुतीच्या कमरेला लागले पाणी
Nashik, Nashik | Jul 6, 2025 गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात दि. ६ जुलै रविवार दिवसभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी नदीला आज रविवारी मोठा पूर आला असून पूर पाहण्यासाठी होळकर ब्रिज, गंगापूर धबधबा, बापू पूल येथे पर्यटक व भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आज दि.6 रोजी सायंकाळी पाच वाजता होते. दरम्यान गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस ठेवला असून रामकुंडाकडे जाणारे रस्ते सायंकाळी पोलिसांनी बॅरेकटिंग लावून बंद केले होते. तर सायंकाळी उशिरा दुतोंड्या मारुतीच्या छातीला पाणी लागले होते.