नागपूर शहर: जरीपटक्यातील हनुमान मंदिरात चोरी; सराईत चोर जेरबंद: अनिल ताकसांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी 10 जूनला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान मंदिरात चोरी करणाऱ्या प्रज्वल मेश्राम या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने मंदिरातील पूजा साहित्य व भांडी चोरली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली आणि खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून, या आरोपीवर यापूर्वीही चार गुन्हे दाखल आ