मानगाव: इंदापूर येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुनील तटकरे नवजीवन विद्यामंदिर नामविस्तार सोहळा
Mangaon, Raigad | Oct 18, 2025 आज शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास इंदापूर येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुनील तटकरे नवजीवन विद्यामंदिर नामविस्तार सोहळा तसेच गेल इंडिया कंपनी लि. यांच्या सीएसआर निधीतून बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. एक शिक्षणप्रेमी नागरिक म्हणून मी या विद्यालयाच्या बांधकामाची संपूर्ण जबाबदारी स्विकारली आणि ती यशस्वीपणे पूर्ण केली, याचा मला आनंद आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही हे सुंदर व आधुनिक शैक्षणिक प्रांगण उभारले आणि आज त्याचे पूर्णत्व पाहून समाधान वाटते. या विद्यामंदिरास माझे नाव देण्याचा सन्मान दिल्याबद्दल माझ्या कुटुंबियांच्या वतीने मी संस्थेचे आणि सर्व संबंधितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.