जालना: सामाजिक न्याय विभागाच्या परिसरात झाडांचा 10 वा वाढदिवस साजरा; निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते नवीन झाडांची लागवड
Jalna, Jalna | Jul 8, 2026 जालना येथील सामाजिक न्याय विभागाच्या परिसरात दहा वर्षापुर्वी लावण्यात आलेल्या झाडांचा आज बुधवार दि. 8 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता 10 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. निवासी उप जिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांच्या हस्ते केक कापून आणि नवीन झाडांची लागवड करुन या झाडांचा वाढदिवस करण्यात आला. तत्कालीन सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांनी माळरानावर लावलेल्या झाडांचे जतन आणि संवर्धन करुन त्याची नियमित देखभाल करण्यात येत आहे. त्यासाठी झाडांची काळजी आणि नियोजन करण्यात येते, उन्हाळ्यात विशेष लक्ष दिले.