लातूर: गांधी चौक पोलीस स्टेशनच्या वतीने हनुमान चौकात नाकाबंदी,18 वाहनांवर कारवाई, 22 हजारांचा दंड
Latur, Latur | Sep 15, 2025 लातूर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गांधी चौक पोलीस स्टेशनच्या वतीने सोमवारी दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी रात्री अकरा ते एक वाजेपर्यंत हनुमान चौक येथे नाकाबंदी लावण्यात आली. या दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली. वाहनधारकांकडे आवश्यक कागदपत्रे, परवाने तसेच दुचाकी स्वार हेल्मेटचा वापर करतात का हे तपासण्यात आला.