अमरावतीत चायनीज मांजा व प्लास्टिकविरोधात मनपाची कारवाई* *25 आस्थापनांची तपासणी; 2 हजार रुपयांचा दंड वसूल* अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले (झोन क्र. 1) यांच्या निर्देशानुसार आज दि. 29 डिसेंबर 2025 रोजी झोन क्र. 1 अंतर्गत रामपुरी कॅम्प परिसरातील प्रविण नगर व शेगाव नाका भागात विशेष मोहीम राबविण्यात आली.