नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दत्तात्रय पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी आज दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी 1च्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लुईस वाडी येथील निवासस्थानी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दत्तात्रय पाटील महापौर असताना नाशिकचा कुंभमेळा पार पडला होता. त्यांचा कुंभमेळा नियोजनातील अनुभव पक्षासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.