नागपूर शहर: कांदा उत्पादकांना न्याय मिळणार, तर बंडखोरांची मनधरणी करणार; चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरणं
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत असून, जागतिक स्तरावरील निर्यात परिस्थितीमुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर नक्कीच सकारात्मक चर्चा होईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.