नागपूर शहर: उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरताना सावधान! चोरीच्या घटना रोखण्यासाठी व.पो. निरीक्षक साईनाथ राम लोड यांचे महत्त्वाचे आवाहन
धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामलोड यांनी तीन मे ला दुपारी चार वाजता दिलेल्या माहितीनुसार उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्यामुळे अनेक कुटुंबे पर्यटनासाठी किंवा गावी जात आहेत. मात्र, या काळात घराकडे दुर्लक्ष झाल्याने घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामलोड यांनी दिली आहे.