अलिबाग: शेतकरी कामगार पक्षाच्या तत्त्वांवर प्रहार, पण कार्यकर्ते ठाम
शेकाप सरचिटणीस जयंत पाटील
Alibag, Raigad | Oct 12, 2025 स्व गणपतराव देशमुख हे सांगोला मतदारसंघाचे ५ दशकांहून अधिक काळ जनतेचे खरे प्रतिनिधी होते. त्यांनी आयुष्यभर शेतकरी, मजूर, आणि सामान्य जनतेच्या हक्कासाठी झटत तत्त्वनिष्ठ राजकारणाचा आदर्श घालून दिला.त्यांच्या निवासस्थानी भाजप पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान काही समाजकंटकांनी केलेला भ्याड हल्ला ही सांगोला तालुक्याच्या संस्कृतीला काळी छाया टाकणारी घटना आहे. हा हल्ला फक्त घरावर नाही तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांवर आणि तत्त्वांवर झाला असल्याचे मत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.