राका येथे अचानक एका घरात आग लागली. या दुर्घटनेत दिव्यांग असलेल्या रेखा आणि त्यांचे वडील हरी इरले यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. आग इतकी भीषण होती की, काही क्षणातच दोन्ही घरांना तिने वेढले आणि संपूर्ण घर जळून राख झाले. या आगीमध्ये धान्य, कपडे, शालेय पुस्तके, दागिने, रोख रक्कम आणि इतर आवश्यक वस्तूंसह सर्व काही नष्ट झाले.