नागपूर शहर: गोरेवाडा तलावात बुडून २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू
31 मे ला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोरेवाडा तलावात पोहायला गेलेल्या एका २७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मृतकाचे नाव: हरीओम रामप्यारे यादव असे सांगण्यात आले आहे.हरीओम गोरेवाडा तलावात पोहण्यासाठी गेला होता, तिथेच त्याचा बुडून मृत्यू झाला.फायर ब्रिगेडच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीमती चंद्रमा रामप्यारे यादव यांच्या माहितीवरून गिट्टीखदान पोलिसांनी 'अकस्मात मृत्यू