अलिबाग: अक्षय्यतृतीया आली; हापूस आवाक्याबाहेरच
Alibag, Raigad | Apr 18, 2026 साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या निमित्ताने अलिबागसह संपूर्ण रायगडातील बाजारपेठांमध्ये आंब्यांची आवक सुरू झाली आहे. मात्र, दर आवाक्याच्या बाहेर असल्याने सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखता आलेली नाही. सध्या बाजारात रायगडातील हापूस 750 रुपये डझन दराने विकला जात आहे. साडेतीन शुभमुहूर्तापैकी दुसरा मुहूर्त म्हणून या सणाकडे पाहिले जाते. या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी अनेक घरांमध्य अक्षय्यतृतीयेच्या दिवशी देवाला आणि पितरांना आंब्याचा नैवेद्य दाखवल्याशिवाय आंबा खाल्ला जात नाही. या दिवसापासूनच आंब्याचा हंगाम अधिकृतपणे सुरू झाला, असे मानले जाते.