रावेर: लालमाती येथे किरकोळ कारणावरून वाद, तरुणाला तिघांची मारहाण, रावेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Oct 19, 2025 रावेर तालुक्यात लालमाती ही गाव आहे. या लालमाती गावात पाण्याच्या टाकीजवळ किरकोळ कारणावरून वाद झाला आणि या वादातून कृष्णा चव्हाण वय२० या तरुणाला हकीम तडवी, हसन तडवी, हुसेन तडवी यांनी मारहाण केली. तेव्हा या तीन जणाविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.