नागपूर शहर: पाचपावली हद्दीत पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा; नागपूर न्यायालयाचा निकाल
पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला नागपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.आरोपी परसुराम उर्फ तुफान स्वामीदीन ब्राम्हणे (वय ३३) याचे त्याची पत्नी सोनू परसुराम ब्राम्हणे (वय ३६) सोबत वाद झाले होते.