मोर्शी: मोर्शी तिवसा बस मध्ये, माळीपुरा मोर्शी येथील महिलेच्या बॅगेतून, दागिने चोरण्याचाप्रयत्न करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
आज दिनांक 19 ऑक्टोबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दिनांक 18 ऑक्टोबरला दीड वाजण्याचे दरम्यान, मोर्शी तिवसा बस मध्ये मोर्शी येथील महिलेच्या बॅगेतून दागिने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महीले विरुद्ध तिवसा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून, दाखल तक्रारीवरून पोलिसांनी शारदा मानवकर व दिपाली सागर हातागडे या दोन महिले विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे