नागपूर शहर: नागपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपिला अटक: सतीश आडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कपिलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 27 मे ला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार कपिल नगर परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी एक महिन्याची गरोदर असून, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत १९ वर्षीय आरोपी अभिषेक यादव याला अटक केली आहे.याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे