भंडारा: करडी पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
करडी पोलिसांनी ढिवरसवाडा ते मांडवी जंगल मार्गावर विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या मिनी ट्रकवर कारवाई केली. 10 लाखांचा ट्रक आणि 6 हजार रुपयांची ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. चालकावर गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे.