अमरावती: विद्यापीठात अभियंता दिवस उत्साहात साजरा,देशाच्या विकासात अभियंत्यांचे मोलाचे योगदान-प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे
आज १५ सप्टेंबर सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता मिळालेल्या माहितीनुसार देशाच्या विकासात अभियंत्यांनी फार मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात अभियंता दिवस मोठ¬ा उत्साहात साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.ते म्हणाले, भौतिक विकासासह सामाजिक गरजा लक्षात घेऊन सामाजिक विकासासाठी आजवर फार मोठी कामगिरी केली आहे. भारतरत्न सर एम. वि·ोसरैय्या यांनी अभियंता म्हणून देशाला दिलेलं योगदान बहुमूल्य आहे.