अहिल्यानगर शहराची ओळख असलेले माळीवाडा वेस पाडण्याबाबत महापालिकेने दोन दिवसांपूर्वी जाहीर प्रसिद्धी देत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवल्या होत्या. मात्र, शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता तर माळीवाडा ग्रामस्थांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला. आज सकाळपासूनच ग्रामस्थांकडून नागरिकांच्या हरकती अर्ज भरून घेत तब्बल दोन हजारांहून अधिक हरकत अर्ज प्राप्त झाले होते. नागरिकांच्या मागणीमुळे महापालिका प्रशासनाने आपला निर्णय रद्द केला आहे