नागपूर शहर: नागपुरात 'खासदार क्रीडा महोत्सव २०२६' चा दिमाखदार सोहळा; सुनील शेट्टींच्या हस्ते उद्घाटन!
नागपूर शहरात क्रीडा संस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने आयोजित 'खासदार क्रीडा महोत्सव २०२६' चा आज बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी यांच्या हस्ते शानदार प्रारंभ झाला. ३१ मे ते ७ जून दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार मायाताई इवनाते, महापौर नीता ठाकरे व इतर मान्यवर उपस्थित होते.