पनवेल: मालडुंगेमधील रेशन धान्याची माहिती देण्यास पुरवठा विभागाची टाळाटाळ?
Panvel, Raigad | Jun 29, 2026 मालढुंगे ग्रामपंचायत हद्दीतील रास्त भाव धान्य दुकानामध्ये होणाऱ्या धान्य वितरणाबाबत माहिती मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून दोन महिन्यांपूर्वी तहसील कार्यालयाला लेखी पत्र देण्यात आले होते. मात्र अद्यापही पुरवठा विभागाकडून संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याने पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र दोन महिने उलटूनही या पत्राला कोणतेही उत्तर देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.