लातूर : कला व चित्रपट क्षेत्र हे आता केवळ मोजक्यांपुरते मर्यादित न राहता सर्वांसाठी खुले झाले असून, तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाला आपली प्रतिभा सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन लातूरचे पोलीस अधीक्षक IPS अमोल तांबे यांनी केले.दयानंद शिक्षण संस्था व अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद सभागृहात आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.