नागपूर शहर: 'आदिवासी' हाच योग्य शब्द, 'वनवासी' संबोधानाचा आदिवासी समाजाकडून तीव्र निषेध
आदिवासी समाजाला 'वनवासी' म्हणून संबोधित करण्याच्या प्रवृत्तीचा आदिवासी संघटनांनी आक्रमकपणे निषेध केला आहे. 'आदिवासी' हा शब्द केवळ आमची ओळख नसून तो आमचा अधिकार असल्याचे या आंदोलकांनी ठामपणे सांगितले आहे.देशाचे मूळ रहिवासी म्हणून आदिवासींची ओळख ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सिद्ध आहे.