जालना: शिवीगाळ करणार्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महिलेचे तीन तास रस्त्यावर आंदोलन
Jalna, Jalna | Jul 7, 2026 शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणार्या व्यक्तीविरोधात पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप करत एका महिलेने मंठा शहरातील मुख्य रस्त्यावर तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. मंगळवार दि. 7 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुनीता डांगे (वय 40) असे आंदोलन करणार्या महिलेचे नाव आहे. आंदोलनाची माहिती मिळताच मंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची समजूत काढली. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात नेले.