प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे दरवर्षीप्रमाणे श्री. पांडुरंग संस्थान व गावकऱ्यांच्या सहकार्याने भव्य असा कार्तिक यात्रा महोत्सव तथा श्रीमद् भागवत कथा, अखंड हरिनाम सप्ताह, व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. दिनांक 29 ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर 2025 या कालावधीत संपन्न झाला. विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, अशा कार्यक्रमाची रेलचेल या महोत्सवामध्ये होती.