पिंपळनेर नगर परिषदेसाठी यंदा प्रथमच निवडणूक झाल्याने आपल्याच पक्षाचा झेंडा नगरपरिषदेवर फडकविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. दिग्गजांना धक्का देत ऐनवेळी पक्षांतर केलेल्या अनेक नवख्या उमेदवारांना नगर परिषद निवडणुकीत संधी देऊन प्रमुख दावेदारांचे तिकीट कापले गेले होते.अनेकांनी वेगळी चूल मांडून निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविण्याचा निर्धार केला होता. पिंपळनेर शहरात प्रथमच नगर परिषद निवडणूक प्रक्रिया पार पडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.२ डिसेंबर रोजी झा