नागपूर शहर: गर्लफ्रेंडला iPhone देण्यासाठी चोरी; कलमना पोलिसांकडून आरोपी ताब्यात: संतोष कुमार रामलोड पोलीस उपनिरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुमार रामलोड यांनी 3 जूनला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,कळमना येथील राहुल बतरा यांच्या गोडाऊनमधून ११ लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गर्लफ्रेंडला iPhone भेट देण्यासाठी त्यांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक संतोष कुमार राम लोड यांनी दिली आहे.