नागपूर शहर: पाचपावली पोलीस ठाण्यासमोर मेट्रो पिलरवरील पेंटिंगमध्ये मोठी चूक; महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेमप्लेट वर पेंटर चे नाव
पाचपावली पोलीस स्टेशनसमोरील मेट्रो पिलरवर करण्यात आलेल्या पेंटिंगमध्ये 'एनसीसी लिमिटेड' कंपनीचा एक मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. या पिलरवर रेखाटण्यात आलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या चित्रातील नेमप्लेटवर चक्क पेंटरने स्वतःचे नाव लिहिले आहे.