आंबेगावात बिबट्याची दहशत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. आंबेगाव परिसरात सलग दोन दिवस बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री उशिरा घराजवळच फिरणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून आला आहे. गावातील शेतकऱ्यांनी जनावरांवरही हल्ल्याच्या घटना घडल्याची माहिती दिली आहे. वन विभागाच्या पथकांनी परिसरात गस्त वाढवली असून पिंजरे लावण्याचे काम सुरू आहे. नागरिकांना रात्री घराबाहेर अनाव