नागपूर शहर: त्या कार्यक्रमात आशाताईंनी माझ्याकडून गाणं गाऊन घेतलं, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आशा भोसले यांची आठवण
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक अष्टपैलू पर्व हरपले आहे. आशाताईंच्या निधनाचे वृत्त समजतात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. प्रतिक्रिया देताना आशा ताईच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान त्यांनी सायंकाळी आशाताई पार्थिवाचे दर्शन देखील घेतले.