नागपूर शहर: भरधाव कारची दुचाकीला धडक; माय-लेक जखमी
13 जूनला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेहेदीबाग पुलाजवळ एका भरधाव पांढऱ्या कारने MH 49 BL 0902 समोरून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सीता जानोरकर आणि त्यांची मुलगी आयशा गंभीर जखमी झाले असून, त्यांना राणी दुर्गावती चौकातील अहर्निश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.