अहिल्यानगर जिल्ह्यातून कोकण अलिबाग येथे सहलीला जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या बसला नगर- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील वसंत टाकी परिसरात आज पहाटे अपघात झाला. या अपघातात चार शिक्षक व एक विद्यार्थी जखमी झाले आहे. नेवासा तालुक्यातील सुरेगाव जिल्हा परिषद शाळेची सहल आज कोकण अलिबाग दर्शनासाठी जात असताना ही घटना घडली.